Academic
Year 2023-24
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अंड कॉमर्स, सातारा
अर्थशास्त्र विभाग आयोजित
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यान
प्रमुख पाहुणे: मा. विजय पाटील
विषय : “लोकसंख्या लाभांश: रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेसामोरील आव्हाने”
|
कार्यक्रमाचा अहवाल
दि.१२ /०७ /२०२३
लाल बहादूर शास्त्री कॉलेज
ऑफ आर्टस्, सायन्स अंड कॉमर्स, सातारा
येथील अर्थशास्त्र विभागामार्फत मंगळवार दि.११/०७/२०२३ रोजी सकाळी ९.०० वा. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या लाभांश: रोजगार निर्मिती व
अर्थव्यवस्थेसामोरील आव्हाने” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय पाटील सहाय्यक प्राध्यापक, डी.
जी. कॉलेज, सातारा हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये उपस्थित
विद्यार्थ्यांना भारतीय लोकसंख्येविषयीची सद्यस्थिती, लोकसंख्या वाढीची कारणे आणि
परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध देशांच्या लोकसंख्या व आर्थिक प्रगती
याविषयीची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना लोकसंख्येविषयी जागृत केले. सध्याची
भारताची लोकसंख्या पाहता आजच्या तरुण पिढीने लोकसंख्या नियंत्रित करणे ही काळाची
गरज आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. भारतातील लोकसंख्या वाढीचा
दर वाढत असून अन्नधान्य उत्पादनाचा दर मात्र घटत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर
उपस्थित होते. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना
लोकसंख्या आणि तरुणांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
व पाहुण्यांची ओळख अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एफ. मुजावर यांनी केले. या कार्यक्रमासाठी
सूत्रसंचालन मा. रमेश मदने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभागातील
डॉ. सतीश व्यवहारे यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक
आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित
होते.
जागतिक युवा
कौशल्य दिनानिमित्त
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आयोजित
विशेष व्याख्यान
दिनांक:
१५.०७. २०२३
विषय: "माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
आवश्यक कौशल्य, विविध संधी
आणि आव्हाने”
प्रमुख वक्ते: मा. बाळकृष्ण लक्ष्मन सुर्वे