Academic Year 2024-25
अर्थशास्त्र विभागामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या आणि विकसित भारत @2047 या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. किशोर सुतार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अशोक तवर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रतिभा चिकमठ या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमजान मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंका पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. अशोक कांबळे यांनी मानले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment