Tuesday, September 27, 2022

Academic Year 2022-23

      

                                Academic Year 2022-23

PAPERS NAME AND CODES(BA and MA)

PAPERS NAME, CODES and OBJECTIVE (BA, MA)

BA Syllabus to be implemented from June 2020 onwards

MA-I Syllabus to be implemented from June 2018 Onwards

MA-II Syllabus to be implemented from June 2018 Onwards.



       “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार  यांसाठी शिक्षण प्रसार” - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर  संचलित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, सातारा

अर्थशास्त्र विभाग

                                                                                         आयोजित

एकदिवसीय कार्यशाळा

केंद्रीय अंदाजपत्रक लाईव्ह प्रक्षेपण, गटचर्चा व व्याख्यान

विषय: ‘केंद्रीय अंदाजपत्रक २०२३-२४ चे सूक्ष्म विश्लेषण’

दिनांक: ०१.०२.२०२३                वेळ: सकाळी १० वाजता

         प्रमुख वक्ते                                              अध्यक्ष                                             

  मा. डॉ. रमजान मुजावर                    मा. प्राचार्य  डॉ. राजेंद्र शेजवळ

            सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग,      (सहसचिव, प्रशासन विभाग

          लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय,  सातारा.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर)

 

प्रास्ताविक         :       डॉ. सतीश व्यवहारे

 

आभार               :       प्रा. प्रिया शिंदे       

 

सूत्रसंचालन        :       प्रा. प्रियांका पाटील

स्थळ – भूगोल विभाग (लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय,सातारा)

 

अहवाल

                                                                                                    दि.०२/२/२०२३

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा अर्थशास्त्र विभागाच्या  वतीने “केंद्रीय अंदाजपत्रक लाईव्ह प्रक्षेपण, गटचर्चा आणि विश्लेषण”  बी.ए व बी.कॉम भाग – १,२ व ३ मधील विद्यार्थांसाठी बुधवार, दि.०१/०२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ साठी मांडलेल्या अर्थसंकल्पातील विविध गोष्टी विद्यार्थ्याना माहिती झाल्या. कररचना, भांडवली तुट, विविध क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदी इ. अनेक घटकांची माहिती विद्यार्थ्यांना अंदाजपत्रकातून झाली.  या अंदाजपत्रकाचे प्रक्षेपण झाल्यानंतर विध्यार्थ्यामध्ये गटचर्चचे आयोजन करण्यात आले होते. गटचर्चचे मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि अंदाजपत्रकाविषयी आपली मते नोंदवली. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एफ. मुजावर यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अंदाजपत्रकाविषयी सखोल माहिती दिली.  

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रा.रमेश मदने, प्रा.प्रियांका पाटील, डॉ.सतीश व्यवहारे उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.                                  

          












Text Box:

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स,सातारा

अर्थशास्त्र विभाग आयोजित 

विशेष व्याख्यान

 

विषय : अमृत महोत्सवातील भारतीय अर्थव्यवस्था आणि भविष्यातील संभावना

    दि. २० /०३ / २०२३        वेळ : सकाळी १०.००  वाजता        स्थळ : विवेकानंद हॉल

 कार्यक्रम पत्रिका 


अर्थशास्त्र विभाग आयोजित

विशेष व्याख्यान

अमृत महोत्सवातील भारतीय अर्थव्यवस्था आणि भविष्यातील संभावना

कार्यक्रमाचा अहवाल

                                                            दि.२०/०३/२०२३

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत दि.२०/०३/२०२३ रोजी अमृत महोत्सवातील भारतीय अर्थव्यवस्था आणि भविष्यातील संभावना या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी  साधनव्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील डॉ.एम.एस.देशमुख  (अधिष्ठाता,मानव्यशास्त्र विद्याशाखा,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) उपस्थित होते. आमच्या महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असताना या ७५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने बदल होत गेल आहेत यासंदर्भात मार्गदर्शन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील बारतीय अर्थव्यवस्था, हरितक्रांती, नवीन आर्थिक धोरण, नवीन कृषी धोरण आणि आजची बह्र्तीय अर्थव्यवस्था यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.भारतीय अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले आणि या अमृत महोत्सवामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने काय साध्य केले आहे याचीही चर्चा त्यांनी केली. आज सेवा क्षेत्राचे महत्व वाढत असून कृषी क्षेत्राचे महत्व कमी होत असून या क्षेत्रासाठी शासनाला कोणते प्रयत्न करावे लागतील  यासंदर्भात चर्चा केली.

या कार्यशाळेचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणारे जे विषय आहेत त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, नवीन आर्थिक धोरण, पंचवार्षिक योजना या घात्कांचेही वाचन करणे गरजेचे आहे  याबाबतचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी प्रस्थाविक केले  तर डॉ.सतीश व्यवहारे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि पडो.प्रीयानक पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या विशेष व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अशोक तवर  आणि  सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.       

                                                                                         

                         

                     

                     

 


 







अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत

अर्थशास्त्र विभाग आयोजित

एकदिवसीय कार्यशाळा

उद्योग : ४.० नवीन कौशल्ये, संधी आणि आव्हाने 


                                                                                दि.२९/०३/२०२३

    कार्यक्रमाचा अहवाल           

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत अर्थशास्त्र विभागामार्फत दि.२९/०३/२०२३ रोजी उद्योग : ४.० नवीन कौशल्ये, संधी आणि आव्हाने या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी  पहिल्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवाजी कॉलेज, सातारा येथील प्रा.किशोर सुतार (सहायक प्राध्यापक, छ.शिवाजी कॉलेज, सातारा) आणि दुस-या सत्रात सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथील डॉ.गजानन खामकर (सहायक प्राध्यापक, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा) उपस्थित होते. आमच्या महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रा.किशोर सुतार यांनी उद्योग: ४.० म्हणजेच चौथी आद्योगिक क्रांतीची सुरवात कशी झाली याबद्दल मार्गदर्शन केले.पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून चौथ्या हरितक्रांतीपर्यंत औद्योगिक क्षेत्रात कसे बदल होत गेले  याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उद्योग: ४.० मुळे नोकरीच्या संधी कशा पद्धतीने आहेत याचेही मार्गदर्शन केले. उद्योग: ४.० मध्ये कोणकोणत्या सांडी आहेत आणि त्यामुळे कोणती आव्हाने निर्माण होतील याचेही मार्गदर्शन केले.दुस-या सत्रात डॉ.गजानन खामकर यांनी विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविताना कोणकोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत यासाठी वेगवेगळी उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचच्या अध्यक्षा महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ.प्रतिभा चिकमठ या होत्या. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी उद्योग ४.० या विषयची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी प्रास्ताविक, डॉ.प्रियांका पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा.रमेश मदने यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या विशेष व्याख्यानासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

                                                            


          


              






                आरोग्य केंद्र मार्फत

   जागतिक हृदय दिन निमित्त व्याख्यान

                                                                                          दि. ३०.०९.२०२२  







                    अर्थशास्त्र विभाग ग्रंथालय भेट

ग्रंथालयातील विविध विभागाची माहिती सांगताना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील  ग्रंथपाल श्री.आर.जे.इंगवले सर, यावेळी उपस्थित अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक व बी.ए.भाग- १ व २ चे विद्यार्थी –विद्यार्थिनी 








उद्योजकता विकास काळाची गरज या विषयावर

एकदिवसीय कार्यशाळा  

                                           Date: 23/09/2022









‘वित्तीय क्षेत्रातील वर्तमान दृष्टीकोन आणि

भविष्यासाठी नियोजन’ या विषयावर व्याख्यान

                                         Date: 11/11.2022







शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक)

 आणि

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, सातारा

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान 

 

विषय : भारतीय शेतीची दशा आणि दिशा   

=============================================================

अहवाल

सातारा : सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स ,सातारा याठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) आणि लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील १६ वे पुष्प मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ.एम.एन.शिंदे यांनी गुंफले. 

          कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकतेतून शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनची भूमिका सांगून भारतीय शेतीची सद्यस्थिती आणि शेती क्षेत्रासमोरील आव्हाने विशद केली.अर्थशास्त्र विभागातील प्रा.रमेश मदने यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनमध्ये घेण्यात येत असलेल्या व्याख्यानाचा उद्देश आपल्या मनोगतातून स्पष्ट करून सुयेकच्या वाटचालीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या व्याख्यानमालेतून अर्थशास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान प्राप्त होत असते असे त्यांनी सांगितले.

          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ.एम.एन.शिंदे यांनी “भारतीय शेतीची दशा आणि दिशा” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापारामध्ये पहिल्या १० देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो. रशिया-युक्रेन ही दोन्ही राष्ट्रे बहुउत्पादक असून या राष्ट्रांच्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गहू व तांदळाची कमतरता निर्माण झाल्याने भारताने १४० कोटी जनतेची अन्नाची गरज भागवून जगातील सर्व देशांना भारताने सर्व देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.बी.एस.कॉलेज सातारा येथील माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.एन.व्ही.शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शेतमालाला योग्य भाव दिला जावा तरच शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होईल असे सांगितले.ब-याच वेळा शेतमाल विकला गेला नाही तर टाकून दिला जातो किंवा त्या शेतमालाची नासाडी होते परंतु हे नुकसान मोठे शेतकरी सोसू शकतील लहान शेतक-यानी काय करायाचे या संदर्भात आपले मट व्यक्त केले.

          सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालायाचे उपप्राचार्य डॉ.अशोक तवर, छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.अनिल वावरे, सुयेकचे माजी अध्यक्ष डॉ.एस.एम.भोसले उपस्थित होते तसेच शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर नुकतीच सदस्यपदी निवड झालेले डॉ.अनिल सत्रे यांचा देखील याठिकाणी विशेष सत्कार घेण्यात आला.याचबरोबर या कार्यक्रमात शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) आणि लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागातील प्रा.प्रियांका पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुयेकचे कार्यकारणी सदस्य आणि एल.बी.एस.कॉलेज सातारा येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.रमजान मुजावर यांनी मानले.

=============================================================

















No comments:

Post a Comment

Academic Year 2023-24

                           Academic Year 2023-24  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,...